डाळिंबसाठी योग्य वातावरण ( TEST PAGE CONTENT )

( TEST PAGE CONTENT )

डाळिंबसाठी योग्य वातावरण

डाळिंबाच्या पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त आहे. उन्हाळ्यातील कडक ऊन आणि हिवाळ्यातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीस योग्य असते. आशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात. अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुद्धा डाळिंबाचे उत्पादन चांगले येते. फुले लागल्यापासून फळे होईपर्यन्तच्या काळात भरपूर ऊन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची फळे तयार होतात.

माती परीक्षण –

माती परीक्षण हे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. माती परीक्षणाद्वारे कोणते पीक घ्यायचे ते नक्की करता येते. तसेच पिकांना कोणती खते व किती प्रमाणात द्यायची ते ठरावात येते .त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते.शेतातील पिकाचे योग्य नियोजन केल्याने दुप्पट फायदा होतो .माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस ‘मृदा आरोग्य पत्रिका’ असे नाव आहे.

परीक्षणासाठी मातीचा नमूना कसा घ्यावा-

मातीचा नमुना घेताना यामध्ये जमिनीची रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करावी. प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घ्यावा. जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा गृहीत धरा. रेषेच्या प्रत्येक टोकाला एक या प्रमाणे एकरी ६ ते ७, २२.५ से.मी. खोलीचे इंग्रजी ‘व्ही’ (V) आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. ‘व्ही’ खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घ्यावा. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा करावेत. सर्व नमुने एका स्वछ पोत्यावर एकत्र करावेत. मातीचे चार भागांत विभागणी करा. समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र करा. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करा.अर्धा ते एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवा.

परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धत –

नमुना घेताना पृष्ठभागावरील काडीकचरा बाजूला करून एका शेतातील सुमारे १५ ठिकाणाहून (१५ से.मी किंवा ६ इंच ) खोलीपर्यंतचा मातीच थर गोळा करावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करायचा असेल तर V या आकारांचा १५ से.मी खोलीचा एक खड्डा करावा.प्रत्येक ठिकाणाहून साधारणपणे अर्धा ते एक किलो मातीचा नमुना घ्यावा. सुमारे १५ ठिकाणचे मातिचे नमुने घेऊन ते स्वच्छ पोत्यावर ठेवतात. मातीतील काडी कचरा काढून ती चांगली एकत्र करावी. त सर्व मातीचे सारखे चार भाग करून समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. हे दोन भाग चांगले एकत्र करून मिसळून त्यांचे परत चार भाग करावेत व समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. सरते शेवटी अंदाजे अर्धा किलो माती मिळेपर्यंत असे करावे व टी माती प्रातिनिधिक नमुना म्हणून एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावी.

जागा कशी निवडावी-

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. गुरे बसण्याची व झाडाखालची,खते व कचरा टाकण्याची,दलदल व घराजवळची,पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.

नमुना घेतल्या नंतर खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा –

1. नमुना क्रमांक
2. नमुना घेतल्याची तारीख
3. शेतक-याचे संपूर्ण नाव
4. गाव आणि पोस्ट
5. तालुका
6. जिल्हा
7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
9. बागायत किंवा जिरायत
10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
13. जमिनीचा उतार किंवा सपाट
14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट